Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, ११ ऑक्टोबर २०२१

by Divya Jalgaon Team
October 10, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष:- जोडीदारामुळे आपला लाभ होईल. महत्त्वाच्या कामात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. दिवस परोपकारात व्यतीत होईल. सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

वृषभ:-खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी खरेदी टाळा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. मित्रांच्या भेटीचा आनंद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावू शकाल.

मिथुन:-जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. वडीलांच्या आशीर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होईल. आपले मनोबल वाढीस लागेल. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना चांगली संधी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क:-जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल. वरिष्ठांची मर्जी ओळखून कामे करा.

सिंह:-स्पर्धेत यश मिळवाल. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रलंबित येणी प्राप्त होतील. व्यवसायिकांना फायदा देणार्‍या संधी समोर यातील. आनंदी दृष्टीकोन बाळगून राहाल.

कन्या:-नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल. आपले विचार लोकांसमोर मांडा. घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. उगाचच चिडचिड करू नका.

तूळ:-लोक तुमच्या कामात ढवळाढवळ करू शकतात. आपले निर्णय स्वत: घ्या. मिळकतीच्या नव्या संधी सामोर्‍या येतील. आपले स्पष्ट मत मांडाल. धावपळ व दगदग वाढेल.

वृश्चिक:-घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. माहितगार लोकांना आपल्या विचारात सामील करून घ्या. प्रलंबित कामे मार्गी लावाल. बोलताना तारतम्य बाळगा. मित्राची भेट उपयुक्त ठरेल.

धनू:-नोकरी, व्यवसायात उत्तम संधी लाभेल. अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. कार्यालयीन सहकार्‍यांशी सलोखा ठेवावा. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल.

मकर:-मानसिक स्वास्थ्य जपावे. धार्मिक भावना वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ संभवतो. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. भावंडांशी मतभेदाची शक्यता.

कुंभ:-व्यावसायिक नव्या जोमाने कामे करतील. दिवसाची सुरुवात धावपळीत होईल. अचानक खर्च उदभवतील. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. नामस्मरण उपयुक्त ठरेल.

मीन:-नोकरीची संधी चालून येईल. उगाच चिडचिड करू नका. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. दिवस धावपळीत जाईल. औद्योगिक वाढ सुखकारक ठरेल.

Share post
Previous Post

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला २५ लाखांचा टप्पा

Next Post

नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्याबद्दल व्यापाऱ्यांनी मानले आमदारांचे आभार

Next Post
नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्याबद्दल व्यापाऱ्यांनी मानले आमदारांचे आभार

नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्याबद्दल व्यापाऱ्यांनी मानले आमदारांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group