Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इगतपुरी-कसारादरम्यान पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा; प्रवासी महिलेवर बलात्कार

by Divya Jalgaon Team
October 9, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
इगतपुरी-कसारादरम्यान पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा; प्रवासी महिलेवर बलात्कार

कल्याण, प्रतिनिधी । सात ते आठ दरोडेखोरांनी धावता ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटण्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. इगतपुरी ते कसारा दरम्यान लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली असून कल्याण जीआरपी पोलिसांनी याप्रकरणी तीन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन इतर आरोपींचा शोध घेत आहे. मात्र मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने सात ते आठ जण ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरोडेखोरांचा हातात फाइटर आणि बेल्ट होता. अनेक प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले. मात्र १५ ते २० प्रवासी सध्या समोर आले आहेत. धक्कादायक म्हणजे एका प्रवाशी महिलासोबत दरोडेखोरांनी छेडछाड सुरू केली. यात एका वीस वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची माहितीसुद्धा पोलिसांनी दिली आहे. काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. दोन दरोडेखोर कल्याण ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे उर्वरित आरोपींच्या पोलिस शोध घेत आहेत. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे . या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

Share post
Previous Post

राज्य शासन अनाथ बालकांचा ‘आधारवड’ पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group