Monday, March 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजी-आजोबांसोबत नातवंडांनी साजरा केला जागतिक शिक्षक दिन

by Divya Jalgaon Team
October 6, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
आजी-आजोबांसोबत नातवंडांनी साजरा केला जागतिक शिक्षक दिन

जळगाव, प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम जे कॉलेज जळगाव येथे आजी आजोबांनी आपल्या नातवंडासोबत जागतिक शिक्षक दिन एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून साजरा केला.

जागतिक शिक्षक दिन तसेच शरदोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आजी-आजोबा मोठ्या उत्साहाने विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले त्यात गीत गायन, अंताक्षरी , प्रश्नमंजुषा , बादली मध्ये चेंडू टाकणे , तांदूळांमधून शेंगदाणे आणि नाणी वेगळे करणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी ये तो सच है कि भगवान है… या गीताने केली तर सांगता सर्व आजी आजोबा यांनी गरबा नृत्य करून केली. आपल्या नातवंडं सोबत अशा स्पर्धेत सहभागी होण्याचा एक वेगळाच आनंद आजी-आजोबांनी यावेळी अनुभवला.

सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ओम सोनार या विद्यार्थ्याचे आजी-आजोबा छगन सोनार व मीना सोनार , द्वितीय क्रमांक -पलक कासार व त्याचे आजी आजोबा तृतीय क्रमांक शर्वरी खैरनार या विद्यार्थिनीचे आजी आजोबा अरुण खैरनार व सुलोचना खैरनार यांनी पारितोषिक पटकावले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले तर तर परीक्षण धनश्री फालक व सरला पाटील यांनी केले तर प्रसंगी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी व मुख्याध्यापिका रेखा पाटील उपस्थित होत्या.यशस्वीतेसाठी सुर्यकांत पाटील , कल्पना तायडे , दिपाली चौधरी , सुधीर वाणी , सुनील नारखेडे आदींनी परिश्रम घेतले.

Share post
Previous Post

नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या वारसास ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप

Next Post

जळगाव गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ना. एकनाथराव शिंदे यांची भेट

Next Post
जळगाव गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ना. एकनाथराव शिंदे यांची भेट

जळगाव गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ना. एकनाथराव शिंदे यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group