Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कॉग्रेसच्या प्रियंका गांधी अटकेचे पाचोऱ्यात पडसाद

by Divya Jalgaon Team
October 5, 2021
in जळगाव, राजकीय
0
कॉग्रेसच्या प्रियंका गांधी अटकेचे पाचोऱ्यात पडसाद

पाचोरा, प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील लखीमपुर मधील शेतकर्‍यांना चिरडले गेलेल्याने त्यांच्या परीवाराला सांत्वन करण्यासाठी जात असताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी अटकेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात जोरदार निदर्शने केली

शेतकर्‍यांच्या जीवावर उठणारे तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे म्हणून उत्तर प्रदेश च्या लखीमपुर येथे शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते या आंदोलनात केंद्रीय मंत्री च्या मुलाने चार शेतकर्‍यांना चिरडले यात शहीद झालेल्या शेतकरी परीवाराला सांत्वन भेट देण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी जात असतानांच त्यांना अटक करण्यात आली असून या भाजपा च्या योगी सरकार विरोधात पाचोरा कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. निदर्शनात ” योगी तेरी ताना शाही नहीं चलेगी नहीं चलेगी” ” जो किसान से टकरायेगा वह मिट्टी में मिल जायेगा,” प्रियंकाजी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, शेतकरी विरोधी काळे कायदे , रद्द झालेच पाहिजे ” अशा अनेक घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणले होते.यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांच्या सह तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड. अंबादास गिरी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, नाना पाटील, शंकर सोनवणे, शंकर धमाले, अनिल धमाले, योगेश धमाले, संतोष पाटील, शंकर महाजन, आबा महाले, रवी ठाकुर, अनिल भोई, भुषण पाटील आदींनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रांताधिकारी अधिकारी कार्यालय गेले असता अव्वल कारकून रमेश मोरे यांना निवेदन देण्यात आले.

Share post
Previous Post

अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण संदर्भात मार्गदर्शन शिबीर

Next Post

१० हजाराची लाच मागणाऱ्या महिला अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

Next Post
१० हजाराची लाच मागणाऱ्या महिला अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

१० हजाराची लाच मागणाऱ्या महिला अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group