जळगाव, प्रतिनिधी । शासनाने सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना शासनाने अन्न परवाना व नोंदणी बंधनकारक केले आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांमध्ये याबाबत अद्याप संभ्रम असल्याने अन्न व औषध प्रशासन व जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळतर्फे उद्या निशुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता नवीपेठेतील एकता पतसंस्थेच्या हॉलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अन्न व औषध प्रशासनाचे यों.को.बेंडकुळे, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ऍड.ललीत बरडिया हे राहणार असून अन्न सुरक्षा अधिकारी राम भटकळ, किशोर साळुंखे, विवेक पाटील, सुवर्णा महाजन हे असणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल कांकरिया, प्रवीण पगारिया, युसूफ मकरा, सहसचिव सचिन चोरडिया, पुरुषोत्तम टावरी, संजय चोपडा हे असतील. जळगाव जिल्ह्यातील अन्न व्यवसायिकांनी या मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहून निशुल्क मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.