Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील दादावाडी येथील जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांची धाड

by Divya Jalgaon Team
October 5, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील दादावाडी येथील जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांची धाड

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दादावाडी येथील पेट्रोल पॅम्पजवळील जुगार अड्ड्यावर आज दुपारच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांनी धाड टाकून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्या दोघांवर जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील शामलाल चंदुमल कुकरेजा (वय-६२) व धानोरा येथील जगन्नाथ काकडू महाजन (वय-३८) असे ताब्यात घेतलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की, शहरातील गुजराल पेट्रोल पंप जवळ बंद पडलेल्या टपरीच्या आडोश्याला काही जण मटका नावाचा सट्टा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.ना. किरण धनगर, पोहेकॉ दिपक पाटील, प्रमोद लाडवंजारी हे आज मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास संशयिताच्या शोधार्थ रवाना झाले.

दुपारी जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयित आरोपी शामलाल चंदुमल कुकरेजा (वय-६२) रा. सिंधी कॉलनी आणि जगन्नाथ काकडू महाजन (वय-३८) रा. धानोरा ता.जि. जळगाव या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडून साडे हजाराची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक किरण धनगर यांच्या फिर्यादीवरून दोघांवर सायंकाळी ५ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Previous Post

सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह

Next Post

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

Next Post
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group