Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर शासन निर्णय

by Divya Jalgaon Team
October 5, 2021
in राज्य
0
सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह

मुंबई, वृत्तसंस्था । सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या ७५ आठवड्यात ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करण्याचा शासनाचा मानस असून त्या अनुषंगानेच शासकीय पत्रव्यवहार व इतर ठिकाणी या सुनिश्चित चिन्हाचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय पत्रव्यवहाराप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात यासंबधीचे बॅनर लावण्याचे निर्देशही सर्व मंत्रालयीन तसेच प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

Share post
Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर

Next Post

जळगावातील दादावाडी येथील जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांची धाड

Next Post
जळगावातील दादावाडी येथील जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांची धाड

जळगावातील दादावाडी येथील जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group