जळगाव, प्रतिनिधी । आम्ही भारत विकास परिषद, जळगाव शाखा आणि लायन्स क्लब, जळगांव या समाजसेवी संस्था असून नेहमी विविध समाज उपयोगी उपक्रम राबावत असतात जसे की वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, फूड पाकीट वाटप, गरीब व गरजुना मदत व विविध साहित्य वाटप, इत्यादि.तसेच संपर्क फाउंडेशन ही संस्थाभारत विकास परिषद, जळगाव शाखेचा एक भाग असून नर्सिंग सुविधा घरपोच देणे, तसेच कोरोंना काळापासून ऑक्सीजन मशीन नाममात्र भाडे तत्वावर देण्याचे कामही संस्था करत असते.
अशा समाजकार्याच्या संकल्पनेतुन देवता लाईफ लाईफ फाउंडेशन, नागपुर ही कॅन्सर ग्रस्त रुग्णांना दर महिना मदत करणारी संस्था राज्यव्यापी रक्तदान जागरूकता अभियान राबवित आहे. अभियानाची सुरुवात नागपुर येथील २० कार्यकर्त्यांसह २ ऑक्टोबर रोजी नागपुर येथून सुरू झाली आणि ६ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे राज्यपाल यांची भेट घेऊन एकूण ३६ जिल्ह्यांचा महाराष्ट्र दौरा करून १५ ऑक्टोबर रोजी नागपुर येथे समारोप होईल.
या अभियानास पाठिंबा देत जळगाव येथे ४ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता शिवतीर्थ, कोर्ट चौक येथे रक्तदान जागरूकता अभियान राबविले गेलेज्यामध्ये अंदाजे ५० व्यक्तींची उपस्थिती होती. या अभियानातसर्व कोविड – १९ नियमावलीचे पालन केले गेले. तसेच काव्यरत्नावली चौक येथे ८.३० ते ११ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केले गेले होते. ज्यामध्ये ३० बॅग रक्तसंकलन झाले. कार्यक्रमास देवता लाईफ फाउंडेशन, नागपुर चे अध्यक्ष किशोर बावणे, उपाध्यक्ष कस्तूरी बावणे, संचालक सारीका पेंडसे, धर्मपेठ महिला मल्टिस्टेट पतसंस्थेच्या अध्यक्ष निलीमा बावणे, डॉ. रवि गिऱ्हे, भारत विकास परिषदेचे सचिव उमेश पाटील, कोषाध्यक्ष गिरीश शिंदे, ग्राम विकास मंत्री प्रसन्न मांडे, लायन्स क्लबचे रीजन चेयरमन रविंद्र गांधी, लायन्स क्लब जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष मनिष मंडोरा, सचिव जगदीश जाखेटे, कोषाध्यक्ष विनोद भंडारी, लायन्स क्लब जळगाव च्या अध्यक्षा किरण गांधी, सचिव रोहित अग्रवाल, कोषाध्यक्ष रामकुमार वर्मा, लायन्स क्लब गोल्ड सिटीचे अध्यक्ष मनोज चांडक, सचिव गणेश तोतला, कोषाध्यक्ष मनोज मालु आदी उपस्थित होते. भारत विकास परिषदेचे योगेश पाटील, रत्नाकर गोरे, जान्हवी खाडीलकर, सीमा महाजन, तसेच लायन्सचे सदस्य राजकुमार कोगटा, उमेश झंवर, सचिन जाखेटे, किशोर बेहरानी, सचिन राका, रितेश छोरिया, उमेश सैनी, मोहन छोरिया, लायन्सचे माजी प्रांतपाल एच. एन. जैन, माधवराव गोलवलकर रक्तपेढीचे जितेंद्र शाह, विरभुषण पाटील, अर्जुन राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लायन्स क्लब सेंट्रल सचिव जगदीश जाखेटे, आभार लायन्स क्लब गोल्ड सिटीचे सचिव सीए गणेश तोतला यांनी केले.