जळगाव – अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या आज झालेल्या बैठकीत युवा जिल्हाध्यक्षपदी दीपकसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अखिल भारतीय क्षत्रीय महासभेची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर विविध पदांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. यामध्ये युवा जिल्हाध्यक्षपदी दिपकसिंह विजयसिंह राजपूत यांची एकमताने ठराव करत बिनविरोध निवड झाली.
तसेच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंग राजपूत, युवा प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंह सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरसिंह राजपूत व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सिंह यांचे अभिनंदन व कौतुक केले.