Friday, February 20, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्न परवाना नोंदणी शिबिर

by Divya Jalgaon Team
October 1, 2021
in जळगाव
0
कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्न परवाना नोंदणी शिबिर

जळगाव, प्रतिनिधी । अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दी जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीत असोसिएशनच्या सभागृहात अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना/नोंदणीबाबत विशेष शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने 1 ऑक्टोबरपासून विक्री बिलांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत परवाना क्रमांक नमूद करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच अन्न धान्य घाउक विक्री, आडतदार, अन्न धान्य वितरक आणि अन्न पदार्थ साठवणुकीसाठी वापरले जाणारे गोदाम याकरीता परवाना/ नोंदणी बंधनकारक असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी अन्न व्यावसायिकांच्या शंकांचे निराकरण करुन शिबिराच्या अनुषगांने परवाना नोंदणी ऑनलाईन पध्दतीव्दारे सुरू करण्यात आली.

या शिबिराचे आयोजन असोसिएशनचे अध्यक्ष शशी बियाणी, उपाध्यक्ष विष्णूकांत मणियार, कार्याध्यक्ष दीपक महाजन, सचिव सुनील तापडिया यांनी यशस्वीरित्या केले. या शिबिरास अन्न व औषध प्रशासन यांचेतर्फे सहाय्यक आयुक्त यो. कों. बेंडकुळे, अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील उपस्थित होते. या शिबिराचा मोठ्या संख्येने आडत विक्रेते व अन्न धान्य विक्रेत्यांनी लाभ घेतला असे बेंडकुळे यांनी सांगितले.

Share post
Previous Post

नाटकामुळे आपल्या जीवनाचे खरे चित्र समोर येते – हर्षल पाटील

Next Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करा – पालकमंत्री

Next Post
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करा - पालकमंत्री

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करा - पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group