जळगाव, प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या एकपात्री नाट्यछटा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पाडण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षल पाटील केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर केसीई सोसायटीचे शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , संदीप केदार , मुख्या. रेखा पाटील तसेच डी व्ही चौधरी यांच्या हस्ते गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नाटकाने आपल्या जीवनाचे खरे चित्र समोर येते. कालबाह्य झालेल्या गोष्टी शिकणे आणि त्यामध्ये प्रावीण्य संपादन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे. ज्या प्रमाणे नाटकात आपल्या चेहऱ्यावर ती आपल्या जीवनाचे वेगवेगळे हावभाव दिसतात त्याचप्रमाणे आपला चेहरा सदा बोलका असावा. स्पर्धा हे साधन आहे ते साध्य करून उपयोग नाही. या स्पर्धेचा जीवनात उपयोग झाला पाहिजे. कोरोना मुळे मोबाईल वर शाळा आली ही गोष्ट खूप सुंदर आहे कारण पालकच आता खरे शिक्षक झालेले आहेत आणि त्यांना आपल्या पाल्याच्या वेगवेगळ्या अडचणी समजू लागलेल्या आहेत आणि ते निवारण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्व भाषा या समान आहेत आणि म्हणून कोणतीही भाषा ही सहजतेने आपण शिकू शकतो फक्त आपल्यामध्ये शिकण्याची उमेद असावी कारण मुलांना आपण जेवढे देणार तेवढं कमीच असतं आणि म्हणून या वयात त्यांची आकलनशक्ती वाढावी यासाठी प्रत्येक पालकाने प्रयत्न केले पाहिजेत. काही कलाप्रकार हा आपल्या भविष्यासाठी महत्त्वाचा असतो आणि म्हणून आपल्या आसपास ज्या संधी मिळतील त्या संधीचं सोनं करणं आपण शिकलं पाहिजे अशा शब्दात प्रमुख पाहुणे हर्षल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेत पहिल्या गटात
प्रथम समृद्धी सचिन भास्कर – बालनिकेतन शाळा ,द्वितीय जतीन गणेश वाशिमकर युनिव्हर्स ॲकॅडमी , तृतीय सहज आनंद फेगडे प वी पाटील विद्यालय , उत्तेजनार्थ १ हंसिका प्रवीण पाटील उज्वल स्प्राऊटर स्कूल , उत्तेजनार्थ २ दूर्वा चंदन पाटील अविनाश आचार्य विद्यालय.
दुसऱ्या गटात प्रथम शर्वा राजेंद्र जोशी -प न लुंकड कन्या शाळा , द्वितीय- कुंजल दीपक दलाल प न लुंकड कन्या शाळा , तृतीय चांदणी आकाश सूर्यवंशी बाल निकेतन शाळा , उत्तेजनार्थ १ प्रांजल राजेश मेटकर नंदिनीबाई मुलींचे विद्यालय , उत्तेजनार्थ २ करण भूषण पाटील ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय .
तिसऱ्या गटात प्रथम -कृष्णगिरी प्रमोदगिरी गोसावी ए टी झांबरे विद्यालय , द्वितीय – वेदश्री धनंजय चौधरी नंदिनीबाई मुलींचे विद्यालय , तृतीय- पायल गजानन थोरात ए टी झांबरे विद्यालय , उत्तेजनार्थ १- खुशी प्रवीण पाटील उज्वल स्प्राऊटर इंटरनॅशनल स्कूल , उत्तेजनार्थ 2 प्रणव सुरेश उशीर थेपडे माध्यमिक विद्यालय. यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी प्रणिता झांबरे , योगेश भालेराव , सी.बी. कोळी , पराग राणे, अतुल पाटील, सरला पाटील आदी उपस्थित होते.