Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुंबई येथील वांद्र्यातून संशयित दहशतवादी एटीएसच्या ताब्यात

by Divya Jalgaon Team
September 30, 2021
in राज्य
0
मुंबई येथील वांद्र्यातून संशयित दहशतवादी एटीएसच्या ताब्यात

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दहशतवादी कृत्यासंबंधी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (वय ५०) असं संशयित दहशतवाद्याचा नाव आहे. एटीएसने दोन संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन यांना ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी, एटीएसने गुरुवारी या प्रकरणात पुन्हा तिसरी अटक केली.

मोहम्मद इरफान रहमत अली शेख (५०) या संशयिताला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. एटीएसने उघड केले की, झाकीर आणि रिझवानच्या चौकशी दरम्यान अली शेखच्या भूमिकेबद्दल सांगितले. त्यानंतर त्याला नागपाडा येथील एटीएसच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आणि गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. एका सुत्राने सांगितले, “सतत चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या सहभागाची कबुली दिली.

“आम्ही त्याच्या घरातून ४९००० रुपये रोख जप्त केले आहेत, जे दहशतवादी कारवायांसाठी होते,” तपासकर्त्याने पुढे म्हटले, “त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे मिळाले होते ज्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

झाकीर आणि रिझवान यांना अनुक्रमे 18 आणि 19 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आणि सुरुवातीला त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. २० सप्टेंबर रोजी एटीएसच्या रिमांडवर न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Share post
Previous Post

जळगावात १५ हजारांच्या चप्पलांची गोणी लंपास करणारे तिघे अटकेत

Next Post

जळगावचा युवा कलाकार शौनक नारळे याच्या अल्बमचे पुण्यात रेकॉर्डिंग

Next Post
जळगावचा युवा कलाकार शौनक नारळे याच्या अल्बमचे पुण्यात रेकॉर्डिंग

जळगावचा युवा कलाकार शौनक नारळे याच्या अल्बमचे पुण्यात रेकॉर्डिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group