Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव शहरात डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
September 29, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
ट्रॅक्टरच्या धडकेत रिंगणगावचा तरुण जागीच मृत्यू

जळगाव शहरात डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । २८ रोजी झालेल्या डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा आज सकाळच्या सुमारास मृत्यू झाला आहे, याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील मंदीराजवळ, व्यंकटेश नगर, हरिविठ्ठल नगर येथे बुधा खंडू बनसोडे (वय ७०) हे शहरात हमालीचे काम करतात. मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता काम आटोपून घराकडे स्वातंत्र्य चौकातून पायी जात होते. त्यावेळी भास्कर मार्केटकडून अमृत योजनेचे डंपर (एमएच १९ झेड २५३४) भरधाव वेगाने आले व बुधा वनसोडे यांना जोरदार धडक दिली. यात ते रस्त्यावर पडले. त्यामुळे डंपरचे पुढचे चाक बनसोडे यांच्या उजव्या पायावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली. दरम्यान याचवेळी पाऊसही सुरू होता.

या घटनेमुळे प्रचंड धावपळ व वाहतूकीची कोंडी झाली होती. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश पाटील व उमेश ठाकून यांनी अपघातस्थळी धाव घेवून जखमी झालेले बनसोडे यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलीस हंसराज देशमुख व मोहसीन खान यांनी डंपर चालकाला ताब्यात घेवून जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान जखमी बनसोडे हे जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना आज बुधवार २९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी शोभाबाई, मुलगा अरूण, तीन विवाहित मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी मयत बुधा बनसोडे यांच्या फिर्यादीवरून डंपरचालकावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.

Share post
Previous Post

गुलाबी चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बनोटी ला बसला

Next Post

सिंधी कॉलनीतील ४२ वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

Next Post

सिंधी कॉलनीतील ४२ वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group