पाचोरा (प्रतिनिधी) – राज्यात सुरु असलेल्या गुलाबी चक्रीवादळाचा फटका मराठवाडय़ातील बनोटी परीसरात बसला असुन शेतकऱ्यांचा तोंडात आलेला घास गेल्याने कोटींचे नुकसान झाले आहे.
गुलाबी चक्रीवादळाने थैमान घातले असुन बनोटी गावाच्या परीसरातील शेतकर्यांचे उभे पिक कापणीवर आल्यावर कायमचे हातातुन गेले आहे. यातच पारस जैन नामक शेतकऱ्यांने कालच आपला पपई चा बाग पंधरा लाखात सौदा केला आणि आज नशिबाने दगा दिल्याने गुलाबी चक्रीवादळात संपूर्ण पपई आडवी झाली आहे. या शेतकऱ्यांने हंबरडाच फोडला. बनोटी गावातच पाणी देखील शिरले आहे.अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे