जळगाव – वीजचोरीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव, भुसावळ व अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये २५ सप्टेंबर २०२१ रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीत विद्युत कायदा-२००३ अंतर्गत कलम १३५ अन्वये दाखल वीजचोरी प्रकरणे म.रा.वि.वि. कंपनीच्या नियमानुसार तडजोड करून निकाली काढण्यात येतील. तरी अशा वीजग्राहकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.