जळगाव (प्रतिनिधी) – येथील सोहम भूषण मोहरीर (वय 9 वर्षे) या चिमुकल्याने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती साकारली आहे. अगदी सुरेख अशी ही मूर्ती साकारल्याने सोहमचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोहम हा काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून त्याला त्याची आई सौ. रूचा भूषण मोहरीर यांनी प्रेरणा दिली. जैन इरिगेशनचे सहकारी भूषण मोहरीर यांचा चिरंजीव आहे.