जळगाव प्रतिनिधी । येथील गोदावरी महाविद्यालयात गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला आहे. यावेळी बाप्पाची महाविद्यालय परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.
पर्यावरण, कोविड लसिकरणावर जनजागृती पर घोषणा देण्यात आली. दरवर्षी नर्सिंग महाविद्यालयाचा गणेशोत्सव हा डोळयाचे पारणे फेडणारा असतो. यंदा कोरोनाचे सावट असले तरी शासनाच्या आदेशानुसार नियमांचे पालन करून गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सव काळात नर्सिंग महाविद्यालयातर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.
च दिवसाच्या प्रतिष्ठापनेनंतर आज बाप्पाची महाविद्यालय परिसरातून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी पर्यावरण व कोविड लसिकरणाचा संदेश देणारे फलक हाती घेउन जनजागृती घोषणा दिल्यात. सुरवातीला बाप्पाची माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड,नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मौसमी लेंढे,उपप्राचार्य मेनका एस.पी,नर्सिंग संचालक शिवानंद बिरादार,प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे, यांच्यासह प्राध्यापक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.