Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर न जाता वेळेतच होणार

by Divya Jalgaon Team
September 14, 2021
in जळगाव, राजकीय
0
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर न जाता वेळेतच होणार

जळगाव, प्रतिनिधी । राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाने आज जिल्हा बँकाच्या निवडणुका वेळेवरच घेण्याचे निर्देश जारी केल्यामुळे आता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लांबणीवर न पडता वेळेवर घेण्यात येईल असे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारला कोरोनाचे कारण देऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचा महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने सोडवून निवडणुका घेण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे. या अनुषंगाने आजच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणारी यंत्रणा असणार्‍या राज्य सहकार निवडणूक प्राधीकरणाने जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश आज जारी केले आहेत.

प्राधिकरणाने डिसेंबर २०२० पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येत्या २० सप्टेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा समावेश नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्था सोडून इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यासाठी मतदारांच्या याद्या तयार करुन सहा महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्राधिकरणाने सांगितले आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जेडीसीसीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. यामुळे आता जळगाव जिल्हा सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग येणार असल्याचे दिसून येत आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १४ सप्टेंबर २०२१

Next Post

पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावात बदली

Next Post
भावी आमदार अतुल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. गटनेता राकेश कोलते एजाज पटेल,फारुख हाजी,गणेश महाजन,धिरज महाजन यांचे उत्कृष्ट नियोजन. यावल दि.14(सुरेश पाटील) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आणि यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांचा रविवार दि.12 सप्टेंबर 2021रोजी अभिष्टचिंतन सोहळा श्री गजानन महाराज मंदिरात आणि त्यानंतर संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि नियोजन पूर्वक पार पडला या अभिष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी आणि नियोजन यावल नगरपरिषदेचे गटनेता राकेश कोलते.एजाज पटेल,फारूक हाजी,गणेश महाजन धिरज महाजन,मोसिन कुरेशी,असलम मेंबर,समीर मेंबर,आशिष पाटील यांच्यासह सानेगुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर यांनी आपल्या मालकीची जागा स्नेह भोजनासाठी उपलब्ध करून उत्कृष्ट नियोजन केले होते. यावल नगरपरिषद माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता राकेश कोलते नगरपरिषद संचालित सानेगुरुजी विद्यालयातील उपशिक्षिका सौ. कविता कोलते यांनी सपत्नीक माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांना पुष्पहारगुच्छ,श्रीफळ देऊन सत्कार केला त्यानंतर सर्व स्तरातील हितचिंतकांनी, मित्रमंडळींनी,राजकीय पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी, समाजसेवकांनी सानेगुरुजी विद्यालयातील शिक्षकांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अतुल पाटील यांना वाढदिवसानिमित्त आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावात बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group