Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज घेतील भूपेंद्र पटेल

by Divya Jalgaon Team
September 13, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज घेतील भूपेंद्र पटेल

गांधीनगर, वृत्तसंस्था । भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी रविवारी भूपेंद्र पटेल (Bhupendra patel) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. ते आज दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भूपेंद्र पटेल गांधीनगरच्या राजभवनातच शपथ घेतील. तसेच मंत्रिमंडळाचे गठनही पुढील 1-2 दिवसात होईल.

गांधीनगरमध्ये होणार शपथ कार्यक्रम
भूपेंद्र पटेल यांच्या शपथ समारंभात केंद्रीयमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाजपचे अनेक वरिष्ठ नेते शपथ ग्रहण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

मुख्यमंत्री बनल्यानंतर भूपेंद्र यांनी काय म्हटले ?
भूपेंद्र पटेल यांनी म्हटले की, सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा (J.P.Nadda) यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी गुजरातमधील विकासाचा रथ असाच पुढे नेत राहील. संघटनेला सोबत घेऊन पुढे चालायचे आहे.

5 वर्षानंतर पाटीदार समुदायाचे नेते मुख्यमंत्री
भाजपने 5 वर्षानंतर पाटीदार (Patidar) समुदायातील व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून दिला आहे. मोदी – शाह यांनी आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हे राजकीय पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

गुजरातमध्ये (Gujrat) पाटीदार समुदायाचे प्राबल्य अधिक आहे. भाजपच्या दोन दशकांपासून जारी असलेल्या विजय अभियानामध्ये या समाजाचे मोठे योगदान आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान ( PM Narendra Modi ) झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पाटीदार समाजाच्या आनंदीबेन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. 2016 साली त्यांनी राजीनामा दिला होता. आता पुन्हा राज्यात पाटीदार समाजाच्या प्रतिनिधीकडे मुख्यमंत्री पद देऊन, पार्टी हायकमांडने पाटीदार कार्ड खेळल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

Share post
Previous Post

जनमत प्रतिष्ठानच्यावतीने चित्रकार सुनील दाभाडे यांच्या सत्कार

Next Post

जळगावात शहरात पुन्हा खून, कोळी पेठेतील आंबेडकर नगर येथील घटना

Next Post
जळगावात शहरात पुन्हा खून, कोळी पेठेतील आंबेडकर नगर येथील घटना

जळगावात शहरात पुन्हा खून, कोळी पेठेतील आंबेडकर नगर येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group