जळगाव, प्रतिनिधी । संपूर्ण राज्यात महिलांवर व मुलींवर अत्याचार, बलात्काराचे प्रकार समोर येत आहे. पुणे शहरातील १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत घडली. मुंबईतील साकिनाका येथेही 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगांमध्ये रॉड घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये दिवसंदिवस महिला अत्याचाराच प्रमाण वाढत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव तर्फ निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना आपले राज्यकर्ते कोणत्या धुंदीत दंग आहेत असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. महिला अत्याचारावरील खटले फास्टट्रॅक मोडमध्ये चालावेत व महिला अत्याचारा संबंधित एक स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणावा व महिला अत्याचार संबंधित तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करावी अशी मागणी महानगर मंत्री रितेश महाजन यांनी केली व राज्य सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी महानगर मंत्री रितेश महाजन, चिराग तायडे, अश्विन वाघ, आकाश पाटील,चैतन्य बोरसे,सौरभ भोई, मनीष चव्हाण,शिवा ठाकूर, हिमानी वाडीकर, संकेत वारूळकर, नितेश चौधरी, निखिल राजपूत आदी कार्यकर्ते उपस्थित होते