Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन

by Divya Jalgaon Team
November 3, 2020
in मनोरंजन, राज्य
0
ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन

अंबरनाथ – जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. ते ८५ वर्षांचे होते. अंबरनाथ इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

पंडित दिनकर पणशीकर यांचा जन्म १९३६ साली झाला होता. ते ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे धाकटे बंधू होते. घरामध्येच कलेचं वातावरण असल्यामुळे त्यांचाही ओढा कलेकडेच होता. लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. दत्तात्रय कुंटे यांच्या तालमीत त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून तब्बल १० वर्ष शिक्षण घेतलं आणि जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली.

गायनासोबतच त्यांना अभिनयातही रुची होती. शास्त्रीय गायक असलेल्या पणाशीकरांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती. शिवाय ‘आडा चौताला’ सारख्या प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो. पंडित दिनकर पणशीकर यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share post
Tags: AmbarnathBollywoodDeathMarathi NewsMumbai NewsPandit Dinkar PanshikarSingerज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन
Previous Post

ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला, सहा ठिकाणांहून गर्दीवर गोळीबार

Next Post

IPL 2020 : हैदराबादपुढे मुंबईचा अडथळा

Next Post
आयपीएल २०२१मध्ये खेळणार नाहीत 'हे' संघ?

IPL 2020 : हैदराबादपुढे मुंबईचा अडथळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group