Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, १३ सप्टेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
September 13, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:-
फसव्या आश्वासनांपासून दूर रहा. आत्मविश्वासाने कामे करा. अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील. आर्थिक बाजू सुधारेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील.

वृषभ:-
कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. व्यावसायिक गोष्टीतील संभ्रम टाळावा. जीवनस्तर सुधारण्याचे योग. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराला खुश कराल.

मिथुन:-
दिवस आपल्या मनासारखा जाईल. धडपड करून का होईना काम पूर्ण कराल. कामांना अपेक्षित गती येईल. शाश्वत प्रयत्न करत रहा. हातातील कामात निष्काळजीपणा करू नका.

कर्क:-
व्यावहारिक स्पष्टता ठेवावी. भावंडांची चिंता लागून राहील. करियर व वैयक्तिक चिंता सतावतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल.

सिंह:-
आपली ठाम मते मांडावीत. प्रसंगांना कणखरपणे सामोरे जा. व्यापारी वर्गाने परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. मंदी चिंता वाढवणारी असेल. नोकरदार वर्गाने आळस झटकून कामे करावीत.

कन्या:-
घरासाठी योग्य अशी खरेदी कराल. चिकाटी सोडू नका. दिवस धावपळीचा जाईल. मात्र त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक सदस्यांचा स्नेह वाढेल.

तूळ:-
कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. कामातील क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. विनाकारण मन चिंताग्रस्त राहील. आपले स्पर्धक त्रस्त करू शकतात. साहसाच्या जोरावर कामे पूर्ण कराल.

वृश्चिक:-
लोक तुमचा सल्ला मानतील. रखडलेल्या कामांना मार्गी लावायला जोर लावा. काहीसा मानसिक त्रास संभवतो. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. नैराश्य टाळण्याचा प्रयत्न करा.

धनू:-
बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. मानसिक अस्थिरता टाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. निष्काळजीपणा करू नका. आत्मविश्वासाने काम करा.

मकर:-
सामाजिक प्रतिष्ठा चांगली मिळेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा होतील. अतिअपेक्षा बाळगू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रलोभनांना बळी पडू नका.

कुंभ:-
लोकांच्या बोलण्याची आपल्यावर भुरळ पडू शकते. कलेत मन रमेल. अधिकार्‍यांच्या सहकार्‍याचा वापर करून घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. मेहनतीला पर्याय नाही.

मीन:-
दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. गुरु कृपेमुळे उन्नती साधता येईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हितशत्रूपासून सावध राहावे. मोठे व्यवहार आज टाळता आले तर पहा.

Share post
Previous Post

पाचोरा रोटरी क्लब तर्फे पत्रकारांचे नेत्र तपासणी शिबीर

Next Post

निर्दयी पतीकडून नवविवाहितेला बेल्टने अमानुष मारहाण

Next Post
धक्कादायक! गर्भवती महिलेवर पाच जणांनी केले बलात्कार

निर्दयी पतीकडून नवविवाहितेला बेल्टने अमानुष मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group