जळगाव – शहरात आज शिवसेना व मांगीलालजी नेत्रपेढी तर्फे १०० नागरिक व शिवसैनिक यांचे नेत्र तपासणी करण्यात आले तसेच २० शिवसैनिकांनी *नेत्रदानाचा संकल्प केला. ह्या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लद्धा, महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच २० शिवसैनिकांनी यावेळी नेत्रदानाचा संकल्प केला.
यावेळी नवीपेठ शाखा प्रमुख जयवर्धन नेवे, शाखा उपप्रमुख लक्ष्मीकांत अडावदकर, सचिव चंद्रशेखर वाणी,उपसचिव निरंजन देशमुख, तसेच हर्षल गवळी, विराज कावडिया ,संदेश झंवर , सुजय रणदिवे, केशव माळी, यश गवळी, तरुण अरतानी, पंकज जैन रोहित गवळी, कृपाल अडावदकर, प्रतीक अडावदकर हे सदस्य उपस्थित होते.
शिवसेना नवी पेठ शाखा व मांगीलालजी नेत्रपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर संपन्न करण्यात आले. तसेच मंगलीलाजी नेत्रपेढी तर्फे डॉ.नयना पाटील, तसेच कार्यवाहक राजश्री डोलहारे यांनी सहकार्य केले.