मुंबई, वृत्तसंस्था । आचार्य विनोबाजी भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, “जनसामान्यांच्या कल्याणासाठी सत्य-अहिंसा, सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे, सर्वोदयाचा मार्ग दाखविणारे आचार्य विनोबाजी भावे यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन. महात्मा गांधीजींच्या कार्य, विचारांचे निष्ठावान अनुयायी असलेल्या आचार्य विनोबाजी भावे यांनी ‘भूदान चळवळी’च्या माध्यमातून सामाजिक समता व न्यायाची क्रांती घडविली. सर्वसमावेशक राष्ट्रउभारणीला गती दिली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. महान संत, कृतिशील विचारवंत, समाजसुधारक आचार्य विनोबा भावे यांचे कार्य, विचार भावी पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”