भुसावळ, वृत्तसंस्था । येथील श्री श्रावक संघाचे माजी कोषाध्यक्ष मदनलाल ललवाणी व कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी .एम. यांची सून वर्षा सुयश ललवाणी यांनी परम पुज्य आचार्य देव विजय प्रभाकर सुरीश्वरजी म. सा. व प.पु. साध्वी प्रज्ञाप्ताश्रीजी, अमितमालाश्रीजी,रत्नशिलाश्रीजी, विनम्रयशाजीश्री यांच्या अनुकंपा व आशिर्वादाने जैनधर्मीय 11 खडतर उपवास केले असून पूर्णाहुती निमीत्त अनुमोदन सोहळा इंटरनॅशनल भक्ती संगीत सम्राट विनीत गेमावत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
त्या ऊच्चशिक्षीत (M.E) असुन त्यांनी प्रथमताहाच अकरा उपवास केले ! त्यांच्या या धार्मिक अनुष्ठानाबद्यल श्री. श्रावक संघ भुसावळ ,श्री श्रावक संघ ठाणा, जैन युवक मंडळ, संयुक्त सेवा महिला मंडळ, नवकार ग्रुप,सखी सहेली ग्रुप,श्री राजस्थान श्वेतांबर मुर्तीपुजक जैन संघ,श्री त्रुषभदेव महाराज जैन धर्म टेंपल एण्ड ज्ञाती ट्रस्ट,पांडव ग्रुप व तसेच अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे!भुसावळातील ललवाणी परीवार हा सदैव तपस्या व धार्मिक कार्यात अग्रेसर असतो असे स्वाध्यायी,जैन कान्फरन्स दिल्ली चे ज्ञानप्रकाश योजनेचे माजी अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा यांनी प्रतीपादन केले!