जळगाव, प्रतिनिधी । मालेगाव मित्र या साप्ताहिक पेपरमध्ये सोनार समाजाबद्दल बदनामीकारक लिखाण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे.
३ रोजी ‘मालेगाव मित्र’ या साप्ताहिक पेपरचे संपादक रामदास पगारे, मोबाईल: ८८८८३३९४६६ व उपसंपादक राजाराम पाटील,मोबाईल: ७७५५९७५१३२ यांनी रजि. नं. एम. ए. एच. बि. आय. एल./ ०३०२/२०२१ या साप्ताहिकात आमच्या सुवर्णकार समाजाचा बदनामीकारक मजकूर लिहिलेला आहे. यामुळे सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
सर्व सुवर्णकार समाजाच्या भावनांना ठेच पोहोचून सर्वांच्या आईवरून घाणेरड्या शब्दात उल्लेख करण्यात आलेला आहे. या लिखाणामुळे समाजात प्रक्षोभक पडसाद उमटत आहेत. तसेच सुवर्णकार व सराफ व्यावसायिकांच्या व्यवसायाबद्दल अत्यंत चुकीचे शब्दांकन केलेले आहे यामुळे समाजाच्या व्यवसायाबद्दल गैरसमज पसरू शकतो. अशा विक्षिप्त प्रवृत्तीवर त्वरित आळा बसावा व या पेपरवर त्वरित बंदोबस्त करून त्वरित कारवाई करण्यात यावी व हा पेपर बंद करण्यात यावा. तसेच सुवर्णकार समाजाचा व सराफ बांधवांच्या भावनांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा.
सदर प्रकरणी योग्य कारवाही न झाल्यास महाराष्ट्रातील सुवर्णकार बांधव व सराफ व्यवसायिक, सुवर्णकार शाखा, संस्था, मंडळ तीव्र आंदोलन करतील. अश्या पद्धतीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
निवेदन देताना उपस्थित समाज बांधव :
यावेळी संजय विसपुते, विजय वानखेडे, प्रशांत विसपुते, संजय पगार, इच्छाराम दाभाडे, नंदूभाऊ बागुल, सुभाष सोनार, पंकज विसपुते, योगेश भामरे, दीपक जाधव, विजय बागुल, गोकुळ सोनार, विनोद विसपुते, गणेश दापोरेकर, विनोद सोनार, रमेश सोनार, संजय दुसाने, विलास बाविस्कर, बापू सोनार, उमेश विसपुते, बबलू बाविस्कर, भगवान सोनार, पंकज रणधीर, रुपाली वाघ, शशिकांत जाधव, सुरेश सोनार, रोहन सोनार आदी उपस्थित होते.