Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चुलत भावासोबत मिळून मुलीनेच केला बापाचा घात

अनैतिक संबंधाचा संशय?

by Divya Jalgaon Team
September 9, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चुलत भावासोबत मिळून मुलीनेच केला बापाचा घात

मलकापूर, प्रतिनिधी । शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील राहणार्‍या रावणचवरे कुटूंबात झालेल्या वादातून मुलीने चुलत भावासोबत मिळून बापाचा पोटात चाकू खुपसून खुन केल्याची हृद्यद्रावक घटना काल रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याघटनेमुळे परीसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान झालेल्या घटनेमागे अनैतिक संबंधांचा संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत परीसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील गुलाब यादव रावणचवरे आपल्या कुटूंबीयांसोबत रहिवासाला आहे. त्याच्या सोबत घरात त्याची एक विवाहीत मुलगी देखील एका वर्षापासुन कौटूंबीक वादामुळे माहेरीच राहत आहे. याबरोबर गुलाब यांचा पुतण्या प्रकाश रावणचवरे हा देखील त्यांच्याकडेच वास्तव्यास होता. काल रात्री मुलगी लक्ष्मी हरीषचंद्र सरीशे वय अठरा, व पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचवरे वय तेवीस या दोघांसोबत गुलाब रावणचवरे याचे काही कारणावरून वादंग सुरू झाला. शाब्दीक चकमक हमरीतुमरीवर येत हामाणारी पर्यंत पोहचली. या भांडणात लक्ष्मी व प्रकाश या दोघांनी मिळून गुलाब रावणचवरे यास बेदममारहाण केली. त्याच वेळेस प्रकाश याने गुलाब रावणचवरे यांच्या पोटात छातीमध्ये चाकुने सपासप वार केले. या घटनेत गुलाब हे गंभीर जखमी झाले मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. झालेली घटना गुलाब रावणचवरे यांच्या तेरा वर्षीय मुलगी वैष्णवी हीने पाहीली होती. तिने तात्काळ घटनेची माहिती जवळील पोलीस ठाण्यात जावून कथन केली. घटनेची माहिती कळताच संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेसंदर्भात वैष्णवी हिने दिलेल्या फियादीवरून मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पो.नि.प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री.बोराडे हे तपास करीत आहेत.

दरम्यान लक्ष्मी शिरसे ही विवाहीत असून ती गेल्या एक वर्षापासुन आई वडीलांकडेच राहत होती. प्रकाश रावणचवरे हा गुलाब यांच्या चुलत भावाचा मुलगा असुन तो देखिल त्यंाच्याकडे वास्तव्यास होता. शिवाय प्रकाशची आई ही गुलाब यांच्या पत्नीची सख्खी बहिण देखिल आहे. प्रकाश व लक्ष्मी हे तरूण असल्याने दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याची चर्चा परीसरात सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. याच अनैतिक संबधंाचा उलगडा गुलाब रावणचवरे यांना झाला असावा असा अदंाज वर्तविला जात आहे. यातून ही हत्या घडली असावी या दिशेने पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस सुत्रांतून सांगण्यात आले. दरम्यान लक्ष्मी व प्रकाश या दोघांनाही पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील कामकाज उशिरापर्यंत सुरू होते

Share post
Previous Post

सर्पदंश टाळण्यासाठी शेतात, घराजवळ वावरताना काळजी घ्यावी

Next Post

सोनार समाज बदनामीकारक लिखाण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post
सोनार समाज बदनामीकारक लिखाण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोनार समाज बदनामीकारक लिखाण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group