जळगाव –जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या उपशिक्षणाधिकारी पदी प्रभारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांची नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली.
विजय पवार यांनी यापूर्वी मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केलेले आहे. जिल्हा परिषदेच्या जन संपर्क अधिकारी पदाचा पदभार त्यांनी सांभाळला होता. ते शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस असून त्यांना शिक्षण क्षेत्रातील कामाचा तेवीस वर्षाचा अनुभव आहे. क्रिएटिव्ह टीचर्स क्लब जळगाव या फेसबुक पेजच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक यांच्या मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम ते राबवत असतात. लॉकडाऊन काळात डिजिटल बुक निर्मिती, ऑनलाईन वेबिनार इत्यादी उपक्रम त्यांनी राबवले होते. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षकवृंद अभिनंदन करत आहेत.