जळगाव – कोरानामुळे जवळपास मार्चपासुन सर्व शाळा बंद आहे . या पार्श्वभूमीवर व्यायामाचा , खेळाचा व मुलांचा काहीच संबध नाही. मैदानाचा , त्यामुळे खेळ व्यायाम मैदानापासून मुले दूर गेली आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी सातत्याने मोबाईलचा वापर विद्यार्थी करीत आहे. त्यालाही मुले कंटाळली आहे. त्यामुळे व्यायाम, मैदानी खेळा पासून मुले अलिप्त झाली आहे.
त्यामुळे त्यांच्यातील प्रतिकार क्षमता कमी होत आहे . विद्यार्थ्यांमधील प्रतिकार क्षमता वाढावी त्यांना व्यायाम , मैदानी खेळ याची गोडी लागावी यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागातर्फे ऑनलाईन व्यायामाचे एक महीन्यापासुन प्रशिक्षण दररोज सकाळी सहा वाजता आॕनलाईन दिले जात आहे. यात धावणे, योगासने, सूर्यनमस्कार ,दंड बैठका त्यासोबत विविध मैदानी खेळांचे मार्गदर्शन त्यांचे महत्व या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या वेळात विदर्भातील क्रीडा प्रशिक्षक संतोष कुमार वाळसे व श्री संजय अंबोदकर मुलांना सकाळी करीत आहे. या दैनंदिन उपक्रमात सूर्यनमस्कार, योगासने, व्यायाम मैदानी खेळांचे मार्गदर्शन याचा लाभ सर्व विद्यार्थी आनंदाने घेत आहे .येथे राहणारी निवासी विभागातील सर्व मुले वेगवेगळ्या गावातील ग्रामिण भागातील आहे हे रोज नित्यनियमाने रोज सकाळी व्यायामासाठी आॕनलाईन ऊपस्थीत राहतात.
विवेकानंद प्रतिष्ठानच्या या ऊपक्रमामुळे मुलांचा व पालकांचा फायदा झाला आहे. व विवेकानंद प्रतिष्ठान प्रत्यक्ष रुपात सातत्याने हे ऊपक्रम राबवित आहे त्याचा फायदा मुलांना निश्चीतच होत आहे अशी भावना पालकांनी व मुलांनी व्यक्त केली आहे. दैनंदिन ऊपक्रम सर्वांसाठीच खुला आहे. प्रत्येक जण या लींकला सकाळी जुळवुन याचा लाभ घेऊ शकतात. शारिरीक प्रतिकार क्षमता, मानसीक स्वास्थ्य, मनाची एकाग्रता शारीरिक कौशल्य विद्यार्थी विकसित करीत आहेत .सद्याची कोरोनाची परिस्तिथीत लक्षात घेता रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी सर्वांचा लाभ विद्यार्थी सोबत पालक सुद्धा घेत आहे . येथे राहणारी निवासी विभागातील सर्व मुले वेगवेगळ्या गावातील ग्रामिण भागातील आहे. हे रोज नित्यनियमाने रोज सकाळी व्यायामासाठी आॕनलाईन ऊपस्थीत राहतात. उपक्रमास विदर्भातील क्रिडा संतोष कुमार वाळसे व संजय आंबोदकर मार्गदर्शन करीत आहे. ऊपस्थीत सर्व विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.