चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे ,छोटे-मोठे बंधारे पाझर तलाव व (गिरणा धरण वगळता) इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, हे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे सद्यस्थितीत आता जामदा बधार्यावरून 1500cusecs पाणी जात असून दुपारनंतर त्यात मोठी वाढ येऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
गिरणा नदी काठावरील गावांना याद्वारे थोक्याचा इशारा देण्यात येत आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात दिनांक 31 ऑगस्ट 2021 दुपारनंतर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तरी सखल नदीकाठावरील गुरेढोरे, जळतंन सामान ,चारा तसेच रहिवास हे तातडीने उंच जागी हलवावे व सावध असावे. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे. असे गिरणा पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी कळविले आहे.