Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात रिक्षातुन प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना लुटले

रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Divya Jalgaon Team
November 2, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात रिक्षातुन प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना लुटले

जळगाव-  रिक्षातून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना लुटल्या प्रकरणी रिक्षाचालकाला रिक्षासह रामानंदनगर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अभीजीत राजू मराठे (रा.पिंपळकोठा,ता. एरंडोल) हे ३० रोजी सायंकाळी यांना तिघांनी लुटल्याचा प्रकार उघडकीस आला असून रिक्षा चालक वसीम शेरअली तेली (२८,रा.फातेमा नगर) याला रविवारी रामानंद नगर पोलिसांनी रिक्षासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८०० रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.

अभीजीत मराठे हे ३० रोजी सायंकाळी इच्छा देवी चौकातून पिंपळकोठा जाण्यासाठी रिक्षात (क्र.एम.एच.१९ व्ही.५८४१) बसले. मागे बसलेल्या तिघांनी काही अंतरावर मराठे यांच्या खिशातून २४०० रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेत त्यांना रस्त्यावर उतरवून पळून गेले होते.

या घटनेनंतर मराठे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना सर्व घटना  सांगितली. सहायक फौजदार गोपाळ चौधरी, विजय खैरे, शिवाजी धुमाळ, रवींद्र पाटील, रवींद्र चौधरी, उमेश पवार, हरीष डोईफोळे, संतोष गीते व सागर देवरे यांच्या प‌थकाने रिक्षा चालक रिक्षा चालक वसीम शेरअली तेली (२८,रा.फातेमा नगर) याचा शोध घेवून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातील रिक्षा ताब्यात घेतली आहे. इतर संशयित दोन जण फरार आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonJalgaon Latest Newsजळगावात रिक्षातुन प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना लुटले
Previous Post

आयटकचा शताब्दी दिन साजरा

Next Post

भाजपचे कार्यकर्ते नाराज- एकनाथराव खडसे

Next Post
या संस्थेच्या प्रॉपर्टी मातीमोल भावात घेतलेल्या नेत्यांचे रेकॉर्ड देईल- खडसे

भाजपचे कार्यकर्ते नाराज- एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group