जळगाव – आयटकने कामगारांचे शोषणा विरुद्ध आवाज उठवून कामगारांचे हक्क मिळवुन दिलेले आहेत. त्याचप्रमाणे किमान वेतन कायदा, बोनस पेन्शन प्राविडंट फंड ग्रॅच्युईटीसाठी कायदे सरकारला अनेक कायदे करायला भाग पाडले. अनेक कामगार कायदे केंद्रात सत्तेवर आलेले मोदीसरकार बदल करीत असून कष्टकरी जनतेला शोषक वर्गाच्या हवाली करीत आहे.
याविरुद्ध कामगारांना लढायचे आहे म्हणून २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन सरकारच्या या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध आणि खाजगीकरण विरोधात येत्या २६ नोव्हेंबरला देशव्यापी संघर्षाचा एल्गार पूकारण्याचा निर्णय घेतला आहे या लढ्यात जळगाव जिल्हात आयटकतर्फे भरीव भागीदारी करण्याच्या निर्धार आयटक च्या शंभराव्या गौरवशाली वर्षानिमित्त 2 वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
त्यावेळी आयटकचे उपाध्यक्ष काॅ अमृत महाजन म्हणाले की , गेल्या शंभर वर्षात ज्या ज्या प्रामाणिक नेत्यांनी कामगारांसाठी आयटकचे नेतृत्व करून त्याग व संघर्ष केला त्यात पंजाब केसरी लाला लजपत राय नेताजी सुभाष चंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू, देशबंधू चित्तरंजन दास माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी तसेच कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस एस मिरजकर, भारताचे माजी गृहमंत्री इंद्रजीत गुप्ता, माजी कृषिमंत्री चतुरानन मिश्रा ,खासदार गुरुदास दासगुप्ता बरं ए बी बदल बर्धन या राष्ट्रीय नेत्यांबरोबर जळगाव जिल्ह्यातीलही कामगार नेते कॉम्रेड स ना भालेराव कॉ व्हि बी मोरे सफाई कामगारांचे नेते सुखदेवराव ढंढोरे तसेच अमळनेर मिल कामगार लढ्यातील हूतात्मे कॉ श्रीपत पाटील व ८ सहकारी यांच्या सहभाग राहिला त्यांच्या त्याग ,संघर्ष आणि बलिदान यांचा वारसा आयटक पुढे चालवत आहे व यापुढे चालवील असा विश्वास व्यक्त केला.
अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, पेन्शनर कामगार संघटनेचे नेते गजानन पोद्दार, अंगणवाडी संघटनेच्या रंजना ताई पाटील, आशा गटप्रवर्तक संघटनेच्या सुनिता ठाकरे, कल्पना बारी ,सुलोचना साबळे ,संजना गोडघाटे, अनिता राजपूत, मधुकर जंगले, नलिनी भंगाळे, गोरख वानखेडे, कालू कोळी, नितीन देवरे , उखा ढीवर, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे बोदवड तालुकाध्यक्ष कूंदन गायकवाड, रामेश्वर चव्हाण तसेच अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होते.