Sunday, April 5, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

by Divya Jalgaon Team
August 28, 2021
in जळगाव, राजकीय
0
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

जळगाव, प्रतिनिधी। शहरातील आज राष्ट्रवादी काँग्रेस महानगर पार्टीची आढावा बैठक महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, एजाज मलिक, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

आज जळगांव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक व युवती कॉंग्रेस,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच इतर सेलचा आढावा घेण्यात आला. जे कार्यकर्ते कार्यकारणीत असून पदाधिकारी आहेत व जे पक्षाचे काम करत नसून त्या पदाधिकारी यांना एक संधी देवून पदमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच जळगांव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली जळगांव महानगर ची कार्यकारणी पुर्णपणे बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारणी ची घोषणा येत्या काही दिवसात करणार आहेत. तसेच या आढावा बैठकीत पक्षसंघटना वाढीसाठीचे मुद्दे मांडण्यात आले व चर्चा करण्यात आली. आगामी महापालिका निवडनूकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रत्येक पदाधिकारी यांनी प्रभागात कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे या सूचना देण्यात आल्या.
या आढावा बैठकीत जळगांव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, एजाज मलिक, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय वंजारी, उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्षा कल्पनाताई पाटील, पदवीधर चे अध्यक्ष प्रा.अनिल पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे, कार्याध्यक्ष तुषार इंगळे, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष रिजवान खाटिक, अल्पसंख्यांक ग्रामीण अध्यक्ष मजहर पठाण, ओबीसी सेलचे अध्यक्ष कौसर काकर, युवती अध्यक्ष आरोही नेवे महानगर वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र देशमुख, तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share post
Previous Post

पेट परीक्षा तात्काळ घेण्यात यावी – सिनेट सदस्य अमोल मराठे

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, २९ ऑगस्ट २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, २९ ऑगस्ट २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group