Friday, March 13, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – खा. उन्मेश पाटील

by Divya Jalgaon Team
August 28, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – खा. उन्मेश पाटील

जळगाव, प्रतिनिधी । यंदाच्या खरीप हंगामात जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने व पावसाचा मोठा खंड पडल्याने 70 टक्के उडीद, मुगाचे पिकाची मर झालेली असून, शेतकऱ्यांच्या हाताशी पिक येण्याची शक्यता धूसर होत आहे.

17 ऑगस्ट 2021 नंतर झालेल्या सततच्या पावसाने, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेले पिकाला देखील कोंब फुटलेले आहेत यामुळे उडीद व मुगाचे थोडेफार येणारे उत्पादन देखील पूर्णपणे वाया गेलेले आहे.

खरीप हंगामात उडीद मूग उत्पादक शेतकऱ्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकऱ्यांना सूर्यफुल इ. पिकाची लागवड व रब्बी हंगाम पूर्व शेती मशागत करण्यासाठी तयारीस लागलेले असून वरील पिकांचे पंचनामे तात्काळ होणे अतिशय गरजेचे असून पंचनामे करण्याचे तातडीने आदेशीत करावे अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे.
आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नमूद केले आहे की जिल्ह्यातील प्रमुख कडधान्य पिक उडीद व मूग आहेत. सदरील कडधान्य पिकाचा खरीप 2021ची पेरणी क्षेत्राची माहिती घेतली असता जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाचे 20911 हेक्टर व मूग पिकाचे 22924 हेक्टर लागवड केलेले क्षेत्र आहे. एकट्या जळगाव लोकसभा मतदार संघातील बहुतांश बागायत व कोरडवाहू शेतकरी खरीप हंगामात उडीद व मूगाची पेरणी करत असतात. यावर्षी जळगाव जिल्ह्यात शासनाने दिलेल्या आकडेवारी अनुषंगाने सदरील पिक परिस्थितीत उडीद व मूगाचे पिक पूर्णपणे वाया गेलेले असून शेतकऱ्यांना यापासून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न मिळणार नाही असे प्रत्यक्ष पाहणी वेळी लक्षात आले आहे.

या वर्षी खरीप हंगामात जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने व पावसाचा मोठा खंड पडल्याने 70 टक्के उडीद, मुगाचे पिकाची मर झालेली असून, शेतकऱ्यांच्या हाताशी पिक येण्याची शक्यता धूसर होत आहे. दि. 17 ऑगस्ट 2021 नंतर झालेल्या सततच्या पावसाने, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेले पिकाला देखील कोंब फुटलेले आहेत यामुळे उडीद व मुगाचे थोडेफार येणारे उत्पादन देखील पूर्णपणे वाया गेलेले आहे.

खरीप हंगामात उडीद मूग उत्पादक शेतकऱ्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकऱ्यांना सूर्यफुल इ. पिकाची लागवड व रब्बी हंगाम पूर्व शेती मशागत करण्यासाठी तयारीस लागलेले असून वरील पिकांचे पंचनामे तात्काळ होणे अतिशय गरजेचे आहे. आपण तातडीने महसूल व कृषी विभागाचे यंत्रणेमार्फत प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मदत मिळण्यास पाठपुरावा करणे सोयीचे होईल. अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप मधील पिक पेऱ्याची सक्ती नको
ई-पीक पाहणी ॲपबाबत कुठेही शेतकऱ्यांना सक्ती करण्यात येऊ नये कारण की बहुतांश शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप बाबत परिपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.तरी मी आशा बाळगतो कि आपण तात्काळ सदरील विषयात लक्ष घालून योग्य ती कारवाई कराल.

Share post
Previous Post

जळगावात भारतीय जनता पार्टी कार्यालयात शुद्धीकरणाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून विकासात्मक कामांचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी

Next Post
यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून विकासात्मक कामांचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी

यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून विकासात्मक कामांचे नियोजन करावे - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group