जळगाव – रामेश्वर कॉलनी परिसरात असलेल्या वंदना गोरख पाटील (वय 42) रा. तुळजाई नगरमध्ये महिलेचा डोक्यावर व गळा चिरून खून केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
वंदना गोरख पाटील (वय 42) रा. तुळजामाता नगर असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होती व महिलेचा खून कशासाठी झाला हे कारण अद्याप ही समोर आले नाही. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस कर्मचारी दाखल झाले आहे. एमआयडीसी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे