यावल प्रतिनिधी । 25 ऑगस्ट रोजी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किनगाव गावात दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास दगडु यादव धनगर या २६ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरातील मागच्या खोलीत रात्री २ वाजताच्या सुमारास झोपला असता घरातीत सुतळी पटयाने घराच्या छताला असलेल्या लाकडी दांडयाला बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची खबर सचिन रामकृष्ण धनगर वय ३६ वर्ष राहणार किनगाव यांने दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे.