जळगाव – पत्रकारितेसह व्यावसायिक छायाचित्रकारांना संघटित करीत गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रदिन महापौर जयश्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅमेरा पूजन करीत गुरुवार दि. १९ ऑगस्ट रोजी पत्रकार भवनात साजरा करण्यात आला… यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी महेश देशमुख, पोलीस निरीक्षक के. के. पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशोक भाटिया व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी व्यसपीठावरून बोलतांना महापौर जयश्री महाजन यांनी “स्माईल प्लिज” म्हणत उपस्थित सर्व छायाचित्रकारांना हसत खेळत अनोख्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे फोटोग्राफर बांधवांच्या विविध उपक्रमासाठी महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या भूखंडाचे सुशोभीकरणासह, मनपा परिसरात छायाचित्रकार बांधवांसाठी प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.
महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवामध्ये स्पर्धात्मक प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न देखील, जळगाव महानगर पालिकेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प महापौर जयश्री महाजन यांनी यावेळी केला.
संस्थेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जाणून घेत, संस्थेला ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. त्याचप्रमाणे आगामी काळात देखील संघटनेच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन देखील उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले.
छायाचित्रांमुळे इतिहास जपण्यासाठी मोठा उपयोग होतो, त्यामुळे आपण करीत असलेले काम हे खूप मोठे असल्याचे सांगत, उपस्थित छायाचित्रकारांना परिवहन विभागाचे अधिकारी महेश देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या…
फोटोग्राफी दिनाचा इतिहास व महत्व चंद्रशेखर नेवे यांनी यावेळी समजवून सांगितले…
गेल्या वर्षभरात कोरोनासह इतर व्याधींमुळे निधन झालेल्या छायाचित्रकार बांधवांना यावेळी श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले…
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव अभिजित पाटील, सहसचिव संधीपाल वानखेडे, माजी अध्यक्ष सुमित देशमुख, पांडुरंग महाले, जुगल पाटील, धर्मेंद्र राजपूत, भूषण हंसकर, अरुण इंगळे, यांनी प्रयत्न केले. यावेळी शहरातील अनेक फोटोग्राफर बांधवांची उपस्थिती होती.