जळगाव – राज्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा गुरुवार व शुक्रवार दि. 5 व 6 नोव्हेंबर, 2020 रोजीचा दौरा कार्यक्रम –
गुरुवार, दि. 5 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी 4 वा. नंदुरबार येथून जळगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण व अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 6 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11 वा. 30 मि. नी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्रकल्प अधिकारी यांच्यासमवेत जिल्ह्यातील आदिवासी उपाययोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक. दुपारी 3 वा. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक, दुपारी 4. वा. जळगाव येथून रावेरकडे प्रयाण, सायं 6 वा. रावेर येथील बोरखेडा रस्त्यावरील हत्याकांडातील पीडित कुटुंबाची आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृह येथे भेट. सांय. 7 वा. रावेर येथून जळगावकडे प्रयाण व सोईनुसार जळगाव येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.