जळगाव – शहरातील हरीविठ्ठल नगरात असलेल्या शामराव नगरात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन तरूणी नाल्यात वाहून आली. परिसरातील नागरिक नाल्यात साप पाहत असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला आहे. काही तरुणांच्या मदतीने तरुणीला बाहेर काढण्यात आले असून तिच्याकडून काहीही प्रतिसाद नसल्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे हरीविठ्ठल नगरातील नाला दुथडी भरून वाहत आहे. बुधवारी दुपारी शामराव नगर परिसरातील नाल्यात एक साप दिसल्याने परिसरातील नागरिक साप पाहत होते. त्याच वेळी नाल्यात एक १५-१६ वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत वाहत आली. नागरिकांचे लक्ष जाताच त्यांनी लागलीच परिसरातील एका डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता कोणताही प्रतिसाद नव्हता. परिसरातील काही तरुणांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, तरुणीकडून काहीही प्रतिसाद नसल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणी अंती तिला मृत घोषित करण्यात आले. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणी हरीविठ्ठल नगरातील रहिवासी असून कालपासून बेपत्ता असल्याचे समजते. तरुणीचा घातपात तर झाला नसावा असा प्रश्न उपस्थित होत आहे.