जळगाव – मोरपंख बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज दि.16 ऑगस्टपासून ” श्री शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताह ” सुरू झाला आहे.. या कथेचा प्रारंभ ( दि.16 ) रोजी दुपारी झाला असून कथाकार श्री.स.गु.शा.विश्वप्रकाशदासजी वेदांताचार्य हे आपल्या मधुर वाणीद्वारे प्रबोधन करीत आहेत.
भगवान श्री स्वामीनारायण व भगवान श्री सिद्धेश्वर महादेव यांच्या असीम कृपेने तसेच प.पु.ध.धु.१००८ आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज आणि स.गु.शा. नीलकंठदासजी तसेच स.गु.शा.श्री.धर्मप्रसाददासजी तथा स.गु.शा.ज्ञान प्रकाशदासजी व स.गु.शा.भक्तीप्रकाशदासजी,स.गु.कोठारी स्वा.श्री.गोविंदप्रसाद दासजी , जळगाव आणि संत मंडळ यांच्या आशीर्वादाने या कोरोना आदी रोगांपासून मुक्तता मिळविण्यासाठी सकारात्मकतेने पवित्र श्रावण महिन्यात दि.16 ते 22 ऑगस्ट रविवारपर्यन्त श्री शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताह संगीतमय पारायणाचे व रुद्रवहनचे आयोजन करण्यात आले आहे.
या कथेचे वक्ते स.गु.शा.श्री. विश्वप्रकाशदासजी वेदांताचार्य हे असून त्यांचा कथा श्रवणाचा लाभ परिसरातील भाविक भक्त घेत आहेत.कथेप्रसंगी भाविक मंडळी तल्लीन होऊन जात आहे.कथेचे यजमान जळगावचे आमदार राजुमामा भोळे , नयना गणेश टोके , गणेश यशवंतराव टोके , मस्कावद आणि चंद्रकांत पोपट पाटील , सातोद हे आहेत.आज प्रथम दिवशी ” ब्रम्हा विष्णू महेश असा सजीव देखावा खूपच आकर्षण ठरला.
शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताह संगीतमय पारायणाची व रुद्रवहनची वेळ दररोज दुपारी 3 ते सायंकाळ 6 वाजेपर्यंत असणार आहे . सदर हा ज्ञानयज्ञ सप्ताह जळगाव शहरातील रायसोनीनगर येथील श्री भरीत सेंटर च्या वरील सुसज्ज सभागृह , मोहाडी रोड महाबळ परिसर येथे सुरू झाला आहे.
यासाठी मनोज फेगडे , पुनम फेगडे , प्रविण गुरुजी ,धुळे खुशाल पाटील , सावदा , कलावंत व जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभत आहे ; ही कथा लाईव्ह असून भाविक भक्तांसाठी आहे.त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोरपंख बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे.