जळगाव – महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सप्ताहाचा समारोप आज रोजी करण्यात आला.
फुफणी गावाचे माजी सरपंच डॉ कमलाकर पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण व संवर्धन सप्ताहाचा मान्यवरांच्या उपस्थितीत आज समारोप करण्यात आला सादर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं स उप सभापती
शितल कमलाकर पाटील सरपंच यमुना कैलास सपकाळे ग्रा प सदस्या श्रीमती कमलताई वाघ श्री,गजानन सपकाळे कैलास सपकाळे आदी उपस्थित होते.
डॉ.कमलाकर पाटील यांच्या पुढाकाराने आज सर्व शाळा प्राथ.,माध्य.भोकर गण पं.स.जळगाव.यांना अॉक्सिजन देणारी वड,पिंपळ व कडुनिंबाचे रोपे व सरंक्षक जाळ्या देण्यात आल्या,ह्या वृक्षांचे रोपण स्वातंञ्यदिनी १५ अॉगस्टला प्रत्येक शाळेत मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
डॉ.कमलाकर पाटील यांनी स्व खर्चाने सुमारे ५००वृक्षलागवड वसंवर्धनाचा संकल्प केला असून परिसरातील सर्व शाळांमध्ये वृक्षवाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला गटविकासअधिकारी यांनी डॉक्टर पाटील यांच्या समाजोपयोगी उपक्रमालाबद्दल अभिनंदन केले.अशीच समाजसेवा,सामाजिक कार्य,विद्याथी हिताची कामे आपल्या हातून घडो अशी मनोकामना व्यक्त केली. सर्व शिक्षक बंधुभगिनींना देखील शैक्षणिक कार्य आता जोमाने शाळा सुरु झाल्यावर करावे अशी सूचना दिली.
भोकर गटातील शिक्षकांच्या वतीने श्री.अरुणकुमार चौधरी.(मु.अ.जि,प.डिजिटल शाळा सावखेडा खु.)यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुञसंचालन श्री,पंकज गरुड यांनी तर आभार प्रदर्शन श्री.नंदकिशोर लोंकलकर केले