पाचोरा प्रतिनिधी – विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हिंदवी स्वराज्य संघटनेमार्फत पाचोरा तालुक्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील गुणवंत 10 वी, 12 वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदवी स्वराज्य संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष कमलेश सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक भाऊराव राऊत, जिल्हाध्यक्ष योगेश दादा पाथरवट, शहरअध्यक्ष राहुल पाटील, तालुकाध्यक्ष सागर कोष्टी यांची उपस्थिती लाभली.