जळगाव – ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव गेल्या ४ महिन्यांतील सर्वात कमी भाव राहिला आहे. हा पूर्ण महिना सोन्याचा दर कमी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकेच्या नोकऱ्यांची आकडेवारी समोर आल्यापासून सोने रोलर-कोस्टर राइडवर आहे. आठवड्याभरापासून सोन्याच्या किंमती कमी होत आहेत. २२ कॅरेटच्या १० ग्रॅमसाठी मुंबईत सोन्याचा दर ४५,२८० रुपये आहे. पुण्यात सोन्याचा दर २२ कॅरेटच्या ४४,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर नागपुरात सोन्याचा भाव २२ कॅरेटच्या १० ग्रॅम प्रति ४५,२८० रुपये आहे. सुवर्णनगरी जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या चांदीचे दर घसरले आहेत. गेल्या २ दिवसात चांदीचे दर तब्बल ४ हजार रुपयांनी तर सोन्याचे दर १ हजार ३०० रुपयांनी खाली आले आहेत. बुधवारी जळगावात सोन्याचे दर ३ टक्के जीएसटीसह ४७ हजार ७०० रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर जीएसटी शिवाय ६३ हजार रुपये प्रति किलो आहेत.