जळगाव प्रतिनिधी – राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ॲड रवींद्र पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
बँकेशी संबंधित मुक्ताबाई संस्थेच्या कर्जाबाबत बँकेकडून सहकार्य मिळत नसल्याने नाराजीतून त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. संस्थांचे एकरकमी कर्ज परतफेड करण्यात आले आहे, या बाबत तांत्रिक बाबीसाठी बँक सहकार्य करीत नाही, कायदेशीर विषय असून देखील अडवणूक केली जात असल्याने ऍड. पाटील यांची नाराजी वाढली होती. त्यांनी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे राजीनामा दिला आहे, अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे खेवलकर या राजीनाम्यावर निर्णय घेतील. अॅड.रवींद्र पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.