जळगाव प्रतिनिधी – वारंवार निधी मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेला प्रत्यक्षात मात्र निधी खर्चाचे वावडे आहे. दरवर्षी निधी अखर्चित राहणे, शासनाला परत जाण्याचे प्रकार पुढे येत असतात.
गेल्या आर्थिक वर्षात नाविण्यपुर्ण याेजनेचे तब्बल २३ काेटी रूपये अखर्चित आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेेने अखर्चित असलेल्या निधीतील कामांना कार्यारंभ आदेश देऊ नये.
या कामांसाठी पुढील वर्षातील निधीतून दायित्व द्यावे लागत असल्याने नवीन वर्षात कामे करण्यास वाव राहत नाही. जिल्हा परिषदेकडून निधी अखर्चित राहत असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली अाहे. निधी खर्च न झाल्याने ताे परत जाताे; परंतु या निधीत मंजुर कामे नंतर हाेतात. त्यामुळे पुढील वर्षाच्या निधीतून आधीच्या कामावर खर्च केल्यामुळे आर्थिक गाेंधळ वाढत आहे. यासंर्दभात जिल्हा परिषदेने वेळेवर निधी खर्च करण्याची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.