जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांची घटत असलेली संख्या पाहता इकरा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवावे असा आदेश आता मागे घेण्यात आला आहे.
नोडल ऑफिसर तथा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी 31 ऑक्टोंबर रोजी हा आदेश काढून पूर्वीचा आदेश रद्द केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, सणावारांचे दिवस असल्यामुळे तसेच कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याकारणाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात रुग्णांची गर्दी होऊ नये याकरिता इकरा हॉस्पिटल मधील रुग्ण स्थलांतरित करू नये असा शनिवारी नवीन आदेश काढण्यात आला आहे. यामुळे ईकरा येथे रुग्णांवर उपचार नियमितरित्या सुरू राहतील अशी माहिती उप प्राचार्य डॉ. शोएब शेख यांनी दिली.