मुंबई – अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उद्या 2 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया ऑनलाईन वर्गासाठी राज्यभरातून 60 हजार 360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात सायन्स शाखेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
इतर इयत्तांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अकरावीच्या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून उद्या 2 नोव्हेंबरपासून या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला सुरूवात होणार आहे. सायन्स, काॅमर्स, आर्ट्स शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून भरणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
शाखानिहाय नोंदणी
आर्ट्स (मराठी) 4527
आर्ट्स (इंग्रजी) 2337
काॅमर्स (मराठी) 5355
काॅमर्स (इंग्रजी) 12,956
सायन्स 35,185
नावनोंदणीसाठी लिंक – https://covid19.scertmaha.ac.in/eleventh
जिल्हानिहाय नोंदणी
पुणे 9511
मुंबई (बीएमसी) 7600
ठाणे 5798
नाशिक 3618
नगर 3034
सातारा 2613
रायगड 2017
मुंबई (डीवायडी) 1875