पाचोरा – कोकणातील महाड, चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर येथे गेल्या आठवडा भरापासुन आलेल्या महापुराने मोठे नुकसान केले आहे,यात वित्तहानी सह जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात झाली आहे.अनेकांना आपला जीव याठिकाणी गमवावा लागला आहे. शेतकरी बांधवांनी देखील आपली जनावरे गमावली अशा चहूबाजूंनी असलेल्या संकटाचा सामना आपले बांधव करीत आहे.
या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ”एक हात कर्तव्याचा , एक हात मदतीचा” असे आवाहन करीत खारीचा वाटा उचलला आहे.
या उद्धवस्त संसाराना सावरण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या (चांगल्या कामाचे कौतुक) संपुर्ण टिमचे अभिनंदन करण्यात आले, यावेळी पाचोरा प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अमित साळुंखे, सिध्दीविनायक हॉस्पिटलचे डॉ स्वप्नील पाटील, पाचोरा पोलीस स्टेशनचे श्री चोबे, राहुल बेहरे, पाचोरा शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावकर यांनी पत्रकार संघाचे उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले.
यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रविण सपकाळे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जेष्ठ सल्लागार संदिप महाजन, कमलेश देवरे, प्रमोद सोनवणे, नितीन पाटील, राकेश सोनवणे, विनायक दिवटे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भुषण महाजन,चेतन निबोळकर, हेमंत विसपुते, पाचोरा तालुका उपाध्यक्ष अनिल आबा येवले, महेश कौडीणय , तालुका अध्यक्ष शांताराम चौधरी , शहर अध्यक्ष अमोल झेरवाल, नगराज पाटील,नाना महाजन, तालुका संपर्क प्रमुख राजेन्द्र शिंपी, तालुका प्रसिध्दी प्रमुख निलेश मराठे, केदार पाटील आकाश पाटील,बबलु मराठे, आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.