जळगाव प्रतिनिधी । भाजप जिल्हा महानगरातर्फे वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयात स्व. चंद्रकांत मेंडकी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठ नेते चंद्रकांत मेंडकी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी उदय भालेराव, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, महानगर सरचिटणीस महेश जोशी, उपाध्यक्ष प्रदीप रोटे, चिटणीस राहुल वाघ, कार्यालय मंत्री प्रकाश पंडीत, जयेश भावसार, संजय भोळे, गौरव सणस आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी चंद्रकांत मेंडकी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.