Friday, February 20, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवा – महापौर

शहर अभियंता, प्रकल्प अधिकारी, प्रभाग अधिकार्‍यांसह बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांना आदेश

by Divya Jalgaon Team
July 23, 2021
in आरोग्य, जळगाव
0
शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवा – महापौर

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध कॉलन्या तसेच उपनगरांतील रस्त्यांवर ‘अमृत’, भुयारी गटार योजनेसह विविध कामांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेले आहेत. मात्र, ते संबंधितांकडून व्यवस्थितपणे न बुजविले गेल्याने जळगावकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

या खड्ड्यांमुळे अपघातही होऊ लागले आहेत. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त व नागरिकांच्याही तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने आज शुक्रवार, दि. 23 जुलै 2021 रोजी दुपारी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आपल्या दालनात बांधकाम विभागाची बैठक बोलावली. त्यात बांधकाम अभियंते, प्रभाग समित्यांचे अधिकारी, प्रकल्प अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना सदर खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश दिले.

शहर अभियंता श्री.अरविंद भोसले, प्रकल्प अधिकारी श्री.योगेश बोरोले, प्रभाग अधिकारी श्री.संजय पाटील, श्री.मनीष अमृतकर, श्री.योगेश वाणी, श्री.प्रकाश पाटील, श्री.मिलिंद जगताप यांच्यासह बांधकाम अभियंते यांच्यासह नगरसेवक श्री.नवनाथ दारकुंडे, श्री.किशोर बाविस्कर यावेळी उपस्थित होते.

शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठांसह विविध कॉलन्या तसेच उपनगरांतील रस्त्यांवर ‘अमृत’, भुयारी गटार योजनेसह विविध कामांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेले आहेत. मात्र, ते संबंधितांकडून व्यवस्थितपणे न बुजविले गेल्याने जळगावकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातही होऊ लागले आहेत. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त व नागरिकांच्याही तक्रारी येत असल्याने आज दुपारी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आपल्या दालनात बांधकाम विभागाची बैठक बोलावली. या बैठकीत शहरातील सर्वच भागांतील रस्ते, बाजारपेठा, कॉलन्या, उपनगरे तसेच अंतर्गत गल्लीबोळांतील रस्त्यांवर ‘अमृत’च्या, भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे पडलेले खड्डे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ बुजविण्यात यावेत व जळगावकरांची यातून सुटका करावी. तसेच अमृतचे नळ कनेक्शनही संबंधितांना त्वरित द्यावेत, असे आदेश दिले.

Share post
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याला मिळाली गुरुपौर्णिमेची अनोखी भेट

Next Post

जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये – जिल्हाधिकारी

Next Post
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group